|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » मनोरंजन » माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतला दाह

माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतला दाह 

प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व असतं आणि नात्यांच्या सहवासामुळे अनेक दु:ख सहन करण्याची ताकद मिळते तर सुखी क्षणांचा आनंद साजरा करायला सोबत मिळते. मग ती नाती आपली किंवा परकी असा भेदभाव नसला तरी मायेची, प्रेमाची भावना त्यामध्ये असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा एक नवा कोरा मराठी चित्रपट ‘दाह : एक मर्मस्पर्शी कथा’ येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट साकारलेला आहे.

युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली असून, डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. या चित्रपटात मराठी मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह राधिका विद्यासागर, सुहृद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौगुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘दाह’ चित्रपटाची कथा ही कौटुंबिक आहे. अतिशय धार्मिक आणि आदर्श वाटाव्यात अशा सौ. साने आणि सुप्रसिद्ध डॉक्टर साने या सुखी जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यांची मुलगी दिशाच्या येण्याने त्यांच्या संसारात सुख आणि आनंद नांदू लागते. पण, हा आनंद किती काळ टिकेल? दिशा ही त्यांची पोटची मुलगी आहे की दत्तक? दत्तक घेतली असेल तर तिचा स्वीकार आनंदाने केला जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात मिळणार आहेत. या चित्रपटातील गाण्यांना संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिले आहे. तर गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुद्ध वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे. मनाला भिडणाऱया दाह चित्रपटाची पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. उमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे.

Related posts: