|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Automobiles » ‘ओकिनावा’ची ‘क्रूझर’ लाँच

‘ओकिनावा’ची ‘क्रूझर’ लाँच 

ऑनलाईन टीम / पुणे :

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर्स उत्पादक ‘ओकिनावा’ कंपनीने ‘ऑटो एक्स्‍पो 2020’ मध्ये प्रोटोटाईप मॅक्झी-स्‍कूटर ‘क्रूझर’ लाँच केली आहे.

ओकिनावाच्या या स्कूटरमध्ये 4 केडब्ल्यूएच लिथियम-आयन, डिटॅचेबल बॅटरी आहे, जी युजर्सना सोयीस्‍कर चार्जिंगची खात्री देते. या स्‍कूटरसोबत हाय-स्‍पीड चार्जर येतो. हा चार्जर 2 ते 3 तासांमध्ये बॅटरीला पूर्ण चार्ज करते, जे या स्‍कूटरचे अद्वितीय वैशिष्टय़ आहे. ही स्‍कूटर प्रतितास 100 किमीची उच्च गती प्राप्त करू शकते आणि एका चार्जमध्ये 120 किमीहून अधिक अंतर पार करू शकते.

स्कूटरविषयी बोलताना ओकिनावाचे व्यवस्‍थापकीय संचालक जीतेंदर शर्मा म्हणाले, ओकिनावा टीम भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीला चालना देण्यासाठी अथक मेहनत घेत आहे. ओकिनावाने अद्वितीय वैशिष्टय़े व लक्षवेधक डिझाईन्सनी युक्त उत्पादने सादर केली आहेत. ही उत्पादने कोणत्याही वयोगटातील युजर्सचे लक्ष वेधून घेऊ शकतात. भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्री अजूनही नवीनच आहे. पेट्रोलवर चालणाऱया वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या कामगिरीशी संबंधित अनेक अंदाज व समज केले जात आहेत. ओकिनावाचे प्रत्येक उत्पादन हे समज मोडीत काढत युजर्सना ईव्हींची समान कार्यक्षमता दाखवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.

 

 

Related posts: