|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » मनोरंजन » अजय-अतुलच्या मराठी गाण्याला चाहत्यांची विक्रमी व्ह्यूजनी पसंती

अजय-अतुलच्या मराठी गाण्याला चाहत्यांची विक्रमी व्ह्यूजनी पसंती 

ऑनलाईन टीम  / मुंबई 
मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतकार भावांची लोकप्रिय जोडी अजय-अतुलने मराठीप्रमाणेच हिंदीमध्ये आपल्या गाण्यांची छाप पाडली आहे. ‘अग्निपथ’ ‘, ‘बोलबच्चन’, सिंघम’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये अजय-अतुलने संगीत दिलं. त्यामुळे त्यांचा नावलौकिक बॉलिवूडपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांचे चाहते ही वाढू लागलेत .या जोडीने आजवर अनेक पुरस्कार पटकावले असून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
‘रेडू’ या चित्रटातील ‘देवाक काळजी रे’ हे गाणं त्याच्या आवाजात स्वरबद्ध झालं होतं. विशेष म्हणजे या गाण्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गाण्याला युट्युबवर १०० मिलिअन (१० कोटी) व्ह्युज मिळाले आहेत. मराठी चित्रपट संगीतातील हा दुर्मिळ मान आहे.सागर वंजारी दिग्दर्शित ‘रेडू’ या चित्रपटाची निर्मिती नवलकिशोर सारडा यांनी केली आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकलेला हा चित्रपट १८ मे २०१८ रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच ‘देवाक काळजी रे’ या गाण्यानं मराठीच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गीतकार गुरू ठाकूर यांनी हे गाणं लिहिलं आहे, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे.

Related posts: