|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » मनोरंजन » “काश्मीर समस्या सोडवली ,तर पाकिस्तान लष्कराला पैसे मिळण्याचा मार्ग बंद होईल”

“काश्मीर समस्या सोडवली ,तर पाकिस्तान लष्कराला पैसे मिळण्याचा मार्ग बंद होईल” 

ऑनलाईन टीम / मुंबई

 

अदनान सामी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच अदनानचा तू याद आयाहा अल्बम प्रदर्शित झाला. त्याने एका वाहिनीला या अल्बमच्या प्रमोशनसाठी मुलाखत सुद्धा दिली, आणि या मुलाखतीमध्ये त्यांने पाकिस्तानवर निशाणा साधलाय. अदनान सामीने दैनिक भास्करला सुद्धा मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीचा काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तान विषयीची भूमिका मांडली.

काश्मीर प्रश्न सोडविला तर पाकिस्तान लष्कराला पैसे मिळण्याचा मार्ग बंद होईल ,असं म्हणत त्यांना पाकिस्तानवर निशाणा साधलाय. काश्मीर सारख्या मुद्द्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणाव आणि वाद आहेत. दोन्ही देशांमध्ये शांतता का नाही , या प्रश्नाचे उत्तर गेल्या 60 ते 70 वर्षांपासून शोधले जाते.पण याचे उत्तर लष्करामध्ये लपलेला आहे. खासकरून पाकिस्तानी लष्करामध्ये , कारण त्यांना काश्मीरच्या मुद्द्यासाठी पैसा मिळतो, असे देखील अदनान म्हणाला .

ज्या दिवशी काश्मीर मुद्दा सोडविण्यात येईल ,त्या दिवशी त्यांच फंडिंग बंद होईल. जर तुम्ही काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांचा विचार केला तर जेव्हा दोन्ही देशांच्या शांततेचा विचार केला तेव्हा कुठे ते थांबण्याचा प्रयत्न झाले आहेत का ? कधी कारगिल युद्ध झाले तर कधी पुलवामाचा हल्ला , असं का होतय यामागे एकच कारण आहे की पाकिस्तानी लष्कराला काश्मीर मुद्दा चर्चेत ठेवायचा आहे , असेही अदनान म्हणाला .

Related posts: