|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » leadingnews » ‘करोना’ विषाणूचे अधिकृत नाव आता ‘कोविड-19’

‘करोना’ विषाणूचे अधिकृत नाव आता ‘कोविड-19’ 

ऑनलाईन टीम / जिनीव्हा : 

जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘करोना’ विषाणूला आता नवीन नाव देण्यात आले आहे. करोना विषाणूला आता ‘कोविड-19’ असे अधिकृत नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधनोम गेब्रेयेसुसने यांनी सांगितले की, करोना विषाणूला अधिकृत नाव देण्यात आले आहे. कोविड-19 असे त्याचे नाव असून को म्हणजे करोना, व्ही म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिसीज (आजार) असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हा विषाणू 31 डिसेंबर 2019 रोजी पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता. आता पर्यंत चीनमध्ये या विषाणूमुळे एक हजारहून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर 42 हजारहून अधिकांना या आजाराची लागण झाली आहे.

 

 

Related posts: