|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वडियेरायबाग येथे बालकाचा खून

वडियेरायबाग येथे बालकाचा खून 

वार्ताहर/देवराष्टे

कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील राजवर्धन परशुराम पवार वय 4 वर्षे या मुलाचा दि. 21 जानेवारी रोजी तोंडावर उशी दाबून खून करण्यात आला. याप्रकरणी मुलाची चुलती शुभांगी प्रदीप जाधव वय 27 रा. वडियेरायबाग हिच्यासह शंकर वसंत नंदीवाले रा. तडसर या दोन आरोपींना चिंचणी वांगी पोलिसांकडून अटक करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 21 जानेवारी रोजी वडियेरायबाग येथील परशुराम बापु पवार यांनी मुलगा राजवर्धन हा सकाळी अकरा वाजता अंगणवाडी शाळेत जात असताना शाळेजवळून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद चिंचणी पोलिसात दिली होती. घटनेच्या अनुषंगाने चिंचणी पोलिसांकडून याचा गोपनीयरित्या तपास सुरु होता. तपासात राजवर्धनची चुलती शुभांगी प्रदीप जाधववर पोलिसांचा संशय बळावला होता.

याप्रकरणी पोलिसांनी शुभांगीला ताब्यात घेत कसून चौकशी केली. चौकशीत शुभांगीने गुह्याची कबुली देत आपणच राजवर्धनचा तोंडावर उशी दाबून खून केल्याचे सांगितले. तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी भाऊ शंकर नंदीवाले यास बोलावून मृतदेह प्रवासी बॅगेत भरला व हिंगणगाव खुर्द येथील देसकट वस्ती जवळील वारुसळा ओढय़ाच्या पात्रात टाकण्यात आला. सदर ठिकाणाहून पोलिसांना मुलाचा हाडाचा सांगाडा शाळेचे दप्तर व कपडे मिळाले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास एपीआय संतोष गोसावी करत आहेत.

पैसे चोरीचा आरोप अन् कृत्य

फिर्यादी परशुराम पवार यांच्या घरातून काही दिवसांपूर्वी अडीच लाख रु. रक्कम चोरीला गेली होती. याबाबत अनेकावर संशय घेण्यात येत होता. यामध्ये आरोपीं शुभांगीवरही संशय व्यक्त करण्यात येत होता याचाच राग मनात धरून आरोपींनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

Related posts: