|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » फिलीपाईन्स-अमेरिका संरक्षण करार संपुष्टात

फिलीपाईन्स-अमेरिका संरक्षण करार संपुष्टात 

मनीला

: अमेरिकेसोबतचा 20 वर्षांपेक्षा अधि काळापासून अस्तित्वात असलेला संरक्षण करार (व्हिजिटिंग फोर्सेस ऍग्रीमेंट-व्हीएफए) संपुष्टात आणण्याची घोषणा फिलीपाईन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी केली आहे. या निर्णयामुळे आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखू पाहणाऱया अमेरिकेच्या प्रयत्नांना झटका बसणार आहे.

दुतेर्ते यांची घोषणा दुर्दैवी आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन व्हावे याकरता चीनवर दबाव निर्माण केला जात असताना चुकीच्या दिशेने उचलेले हे पाऊल उचल्याचे विधान अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर यांनी केले आहे.

1998 मध्ये झालेल्या व्हीएफए अंतर्गत अमेरिकेच्या सैन्यतुकडीला फिलीपाईन्समध्ये प्रवेश करण्याची सुविधा प्राप्त झाली होती.

फिलीपाईन्सच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आणि न्यायपालिकेचा अपमान झाल्याने हा करार संपुष्टात आणला गेला आहे. अन्य देशांशी संबंध प्रस्थापित करण्यास आता मोकळे आहोत. कराराच्या आड अमेरिका हेरगिरी करत असल्याचा आरोप दुतेर्ते यांच्या प्रवक्त्याने केला आहे.

Related posts: