|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » श्रावणी इलेव्हन, किंग्स ऑफ अथैया संघ ठरले सरस …

श्रावणी इलेव्हन, किंग्स ऑफ अथैया संघ ठरले सरस … 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी चॅम्पियन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱया दिवशी श्रावणी इलेव्हन व किंग्स ऑफ अथैया या दोन मातब्बर संघांनी आपल्या खेळाचा जलवा दाखवला. तडाखेबाज फलंदाजी, गोलंदाजी आणि बहारदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत या दोन संघांनी प्रवेश केला. तर वायसीसी पावस, मातोश्री, जागृती, रत्नागिरी कुवैत या संघांना पराभवाला सामोरे जावे लागले.

   श्रावणी संघाने पहिले दोन सामने एकहाती जिंकल्यानंतर तिसऱया म्हणजेच उप-उपांत्य फेरीत जागृती संघविरुद्ध आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सहज विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात श्रावणी इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः खोलवर पध्दतीच्या भेदक गोलंदाजीची कमाल केली. प्रजोत अंभीरे, प्रीतम बारी, मुसा पटेल, अनिकेत राऊत या गोलंदाजांनी वाखाणण्याजोगी गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यामुळे सामन्यात जागृती 11 संघाला अवघ्या 30 धावांत रोखलं तर हे धावांच लक्ष श्रावणी संघाने 10 गडी राखून सहज पूर्ण करत एका मोठय़ा विजयाची नोंद केली. गोलंदाज प्रीतम बारी सामनावीर ठरला.

   किंग्स ऑफ अथैया संघाने उप-उपांत्यपूर्व टिंगरे सरकार संघाला पराभवाचा धक्का दिला. अथैया संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी दिलेला निर्णय टिंगरे सरकार संघाला महागात पडला. अथैया संघ प्रथम फलंदाजी करताना फलंदाज रजत मुंढे नावाच्या सुनामीचा जोरदार तडाखा टिंगरे सरकार संघाला बसला. रजत मुंढेने 4 चौकार व 6 षटकार मारत नाबाद 62 धावा केल्या. मयुर दातीलकरने रजतला साथ देत नाबाद 24 धावा केल्या. अथैया संघाने टिंगरे सरकार संघासमोर 100 धावांच आव्हान ठेवले. मात्र हे आव्हान टिंगरे सरकारला पार न करता आल्याने अथैय्याचा 58 धावांनी विजय झाला.

   उप-उपांत्य फेरीत किंग्स ऑफ अथैया संघाची वायसीसी पावस संघाशी लढत झाली. किंग्स ऑफ अथैया संघाने प्रथम फलंदाजी करत पावस संघासमोर 70 धावांच आव्हान ठेवलं होते. मात्र वायसीसी पावस संघ 70 धावांचा पाठलाग करत असताना त्यांचा सलामीवीर मुन्ना शेख स्वस्तात बाद झाला. त्यानंतर उस्मान पटेलने डावाला आकार देण्यास सुरुवात केली खरी परंतु वैयक्तिक 15 धावा करुन तो तंबूत परतला. उस्मान पाठोपाठ उमर खान, गईसुद्दीन शेख, अमोल दुबे, अरविंद राणा, अतिष केदारी हे सर्व स्वस्तात बाद झाले. साकीब खानने हा सामना आपल्या फलंदाजीच्या जोरावर रंगतदार केला. सामन्याच्या शेवटच्या षटकात अवघ्या 10 धावांची गरज असताना 6 धावांनी किंग्ज ऑफ अथैया संघाच्या बाजूने झुकवला आणि आपल्या संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. जीवित म्हात्रे सामनावीर ठरला. तर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा किंग्स ऑफ अथैया हा स्पर्धेतील दुसरा संघ ठरला. ..

Related posts: