|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सिद्धार्थनगर पाली संघ डॉ.आंबेडकर कबड्डी चषक 2020 चा मानकरी!

सिद्धार्थनगर पाली संघ डॉ.आंबेडकर कबड्डी चषक 2020 चा मानकरी! 

वार्ताहर/ पाली

पाली दिक्षाभूमी येथे सिद्धार्थनगर पाली आयोजित दोन दिवसीय प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेचे उदघाटन रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्याहस्ते झाले. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत सिद्धार्थनगर पाली संघाने महालक्ष्मी गराटेवाडी संघावर 6 गुणांनी मात करत विजेतापदाचा बहुमान मिळवला. 

स्पर्धेमध्ये विभागातील 16 संघानी सहभाग घेतला होता. विजेत्या पदासाठी अंतिम सामना सिद्धार्थनगर पाली विरुद्ध महालक्ष्मी गराटेवाडी यांच्यात लढत झाली. पहिल्या डावात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दुसऱया डावात सिद्धार्थनगर पाली संघाने जोरदार लढत देत 23 गुण मिळवत विजयी बाजी मारली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पाली पंचक्रोशी अध्यक्ष विठ्ठल सावंत, तक्षशिला पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे, पाली सरपंच नितीन देसाई, माजी सरपंच रामभाऊ गराटे, संदीप गराटे, मंडळाचे अध्यक्ष विवेक सावंत, प्रदीप सावंत, अमोल सावंत, शितल सावंत, प्रमोद जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विजेत्या सिद्धार्थनगर पाली संघाला रोख रुपये 7,777 व आकर्षक चषक व उपविजेत्या महालक्ष्मी गराटेवाडी संघाला रोख रुपये 5,555 व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. मालिकावीर पुरस्कार ऋषीकेश साळुंखे तर उत्कृष्ठ चढाई अतुल गराटे, उत्कृष्ठ पकड सौरभ जाधव यांना गौरवण्यात आले.

Related posts: