|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुख्यमंत्री 17 रोजी गणपतीपुळेत!

मुख्यमंत्री 17 रोजी गणपतीपुळेत! 

शिवसैनिकांकडून स्वागताची जय्यत तयारी

वार्ताहर/ गणपतीपुळे

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 17 फेबुवारी रोजी गणपतीपुळे दौऱयावर येत आहेत. या दौऱयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे विकास आराखडय़ातील प्रमुख कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर शिवसैनिकांची जाहीर सभा दुपारी 12:30 वाजता गणपतीपुळे येथील आठवडा बाजार मैदानात होणार आहे.

  मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच कोकणात येत असल्याने जिह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांकडून जय्यत तयारी  सुरू  आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे एमटीडीसीच्या सभागृहात रविवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिह्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोठय़ा संख्येने आपआपल्या भागातील शिवसैनिकांना आणण्यासाठी तयारीला लागावे, अशा सक्त सूचना दिल्या. तसेच शिवसेना पक्षप्रमुख हे महाविकास अघाडीचे मुख्यमंत्री असल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पत्राद्वारे कळवून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी निमंत्रित करावे, असे आदेश शिवसेनेच्या विभागप्रमुखांना दिले आहेत.

 

Related posts: