|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लक्ष्मीनारायण मिश्रा नवे जिल्हाधिकारी

लक्ष्मीनारायण मिश्रा नवे जिल्हाधिकारी 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाली असून त्यांच्या जागी लक्ष्मीनारायण मिश्रा सूत्रे स्वीकारणार आहेत. मिश्रा सध्या पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत असून यापुर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

बुधवारी राज्यातील आयएएस अधिकाऱयांच्या बदल्यांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची जागा लक्ष्मीनारायण मिश्रा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून मिश्रा यांनी यापुर्वी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. आता जिल्हाधिकारी म्हणून ते रूजू होणार असल्याने कर्मचारीवर्गामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मिश्रा यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना केवळ जनतेच्या नव्हे तर कर्मचाऱयांचेही प्रश्न सोडवताना त्यांच्याशी सलोख्याचे नाते जपले होते. परिणामी कोणतेही निर्णय अथवा काम करताना जिल्हा परिषदेतील सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी त्यांच्यासोबत असायचे. जिल्हाधिकारी म्हणून जिल्हय़ाच्या विकासाच्या दृष्टीने ते महत्वपुर्ण भुमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बदलीच्या वेटींग लिस्टमध्ये

  रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या जागी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाल्याने सुनील चव्हाण यांची बदली नेमकी कुठे झाली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. याविषयी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांना अद्यापही पुठेही नियुक्ती मिळाली नसून लवकरच त्यांचीही ऑर्डर येईल, असे सांगण्यात आले. 

Related posts: