|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

आंगणेवाडी यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात 

युद्धपातळीवर कामे सुरू, भाविकांना दर्शनासाठी नऊ रांगांची व्यवस्था

प्रतिनिधी/ मसुरे

आंगणेवाडी यात्रोत्सवाची जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यंदाही भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबियांनी कंबर कसली आहे. कणकवली, मसुरे, मालवण स्टँडकडून भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन घेण्यासाठी नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग आणि ज्ये÷ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे. भराडी देवीचे थेट मुखदर्शन घेण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे, व्हीआयपी व्यक्तींसाठी विशेष रांगेची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती आंगणे कुटुंबियांनी दिली. 

  आंगणेवाडी येथील भराडी देवीचा यात्रोत्सव 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्त भराडी मंदिर परिसराचा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने आढावा घेतला.  अध्यक्ष भास्कर आंगणे, सचिव मधु आंगणे, कार्याध्यक्ष प्रकाश आंगणे, गजानन उर्फ बाबू आंगणे, दीपक आंगणे, नंदकुमार आंगणे आदी उपस्थित होते.

 भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून व्हीआयपी व्यक्तींच्या दर्शनावेळी भाविकांच्या दर्शन प्रक्रियेत कोणताही खंड पडणार नाही, याचीही दक्षता आंगणे कुटुंबीय आणि प्रशासन घेणार आहे. दिव्यांग बांधवांना मंदिरापर्यंत आणण्यासाठी तिन्ही बसस्थानकावरून प्रत्येकी दोन रिक्षा सोडल्या जातील. यात्रोत्सवासाठी रेल्वेने येणाऱया भाविकांना रेल्वे स्थानकावरून जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. व्यापाऱयांसाठी पिण्याच्या पाण्याची, लाईट व्यवस्था आंगणे कुटुंबियांतर्फे करून देण्यात आली आहे. या वषीही भाविकांना मोफत प्रसाद वाटप मंदिराच्या मागील बाजूस देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर करण्यात येणार आहे, असे आंगणे कुटुंबियांतर्फे स्पष्ट करण्यात आले.

             राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करू नये!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 17 रोजी देवीच्या दर्शनासाठी येत असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. भराडी माता ही शक्तीची देवता असून राजकीय पक्षांनी देवीसमोर शक्तिप्रदर्शन करू नये. मंदिर परिसरात आंगणे कुटुंबियांच्या जाहिराती असतात. त्यामुळे राजकीय व्यक्तींनी मंदिर परिसरात जाहिरातीसाठी दबाव आणू नये. देवीचे दर्शन घेताना घोषणाबाजी करू नये, राजकीय झेंडय़ांचे प्रदर्शन पूर्णतः टाळावे, अशा सूचना आंगणे कुटुंबियांनी केल्या आहेत. आंगणेवाडीत दारू बंदी हा अलिखित नियम आहे. त्यामुळे भाविकांनी दारू पिऊन येऊ नये. नशा पाणी करताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

              प्लास्टिकमुक्त आंगणेवाडीसाठी पुढाकार

भराडी देवीच्या दर्शनाला 17 रोजी पहाटे तीनपासून सुरुवात होईल. नंतर रात्री 9 ते 1 या चार तासांत आंगणे कुटुंबियांचे मंदिरात धार्मिक विधी होतील. मध्यरात्री एकनंतर दर्शन, ओटी भरणे आदी कार्यक्रम पूर्ववत सुरू होतील. भाविकांनी कमीत कमी वेळेत समाधानाने दर्शन घ्यावे, अशी आमची भूमिका आहे. स्वच्छ भारत अंतर्गत गतवषी प्लास्टिकमुक्त आंगणेवाडीला प्रतिसाद मिळाला. यावषीही हा उपक्रम राबविला जाणार असून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बचतगटाच्या माध्यमातून व्यापाऱयांना कागदी पिशव्या पुरविण्यात येणार आहेत. ओटीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये. आंगणे कुटुंबियांतर्फे प्रत्येक दुकानदारास मोफत मोठी पिशवी कचरा साठविण्यासाठी देण्यात येणार आहे. नियमाचा भंग करणाऱयाला 5000 रुपये दंड आकाराला जाईल, अशा सक्त सूचना आंगणे कुटुंबियांतर्फे करण्यात आल्या.

कोणत्याही साधनाने देवीचा फोटो काढू नये. जर कोणी फोटो काढताना आढळून आल्यास ते फोटो साहित्य जप्त करण्यात येईल. देवीचा फोटो काढण्यास आंगणेवाडीत सक्त मनाई आहे. 19 रोजी भराडी मंदिsswर येथे देवीचा वार्षिक गोंधळ असून 20 रोजी आंगणेवाडीचा सुपुत्र असलेल्या संकेत आंगणे या युवकाने लिहिलेल्या ‘एके दिवशी कोकणात’ हा स्थानिक मंडळाचा नाटय़प्रयोग रात्री 10 वाजता आंगणेवाडीत होणार आहे, अशी माहिती आगणे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related posts: