|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » संवाद » प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं 

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे’ यापासून ते >???ेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा आभाळापर्यंतं पोचलेलं’, या साऱया कवितांतून कवींनी प्रेमावर आपापलं मत मांडी कळत नाही. कुठे हे आजच्या स्मार्ट पि‌ढाr?ं प्रेम आणि कुठे ते एका नजरेसाठाचं प्रेम, हे सर्वज्ञात आहे. प्रेम म्हणजे काही वेगळं नसतं, शेतावर गेलेला आपला कारभारी कधी परतेल, हे त्याची कारभारीण उंबरठय़ावरून टाचा उंचावून वाट पाहत असते, प्रेम तेव्हा असतं. कवीचं कवितेवर, कोकिळेचं गाण्यावर, चातकाचं पाण्यावर, आईचं बाळावर, बाबांचं चिमुकलीवर, सावरकरांचं मातृभूमीवर आणि मातीचं तिच्यातून उमलणाऱया अंकुरावर’ अशी अनेक उदाहरणे आहेत. थोडक्मयात सगळीकडे प्रेमच असतं, फक्त नात्यांतली रूप वेगळी असतात.हे प्रेम निसर्गातून येतं.

आज कुठल्याही मॉलमध्ये, कॅफेमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये, >?ो’ आणि >?ी’ बिनधास्तपणे हातात हात घालून मस्तपैकी हिंडताना आढळतात. मात्र आजच्या पिढीचं ऑनलाइन प्रेम कधी ऑफलाइन होतं, त्यांनाही कळत नाही. कुठे हे आजच्या स्मार्ट पि‌ढाr?ं प्रेम आणि कुठे ते एका नजरेसाठी आसुसलेलं प्रेम. आज प्रेमाची परिभाषाच बदलली की काय, असा प्रश्नच पडतो. तू नही तो और सही, सकाळी एक संध्याकाळी दुसरी. व्हॉट्स
ऍपचं स्टेटस बदलावं तसं प्रि‌य्ाकर-प्र‌s³eसी बदलतात.

पाडगावकर म्हणायचे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं… काळ बदलला तसं प्रेमही बदललं. पूर्वी मॉल, कॅफे असलं काही नव्हतं, मग ‘तो’ आणि ‘ती’ भेटणार तरी कुठं, तर शाळेत, देवळात, कॉलेजात, शिकवणीत. वह्यांची देवाणघेवाण व्हायची आणि सुरू व्हायचा प्रेमाचा सिलसिला. ते चोरून पाहणं, ते लाजणं, त्यात खूप प्रेमळ भावना होत्या, आतुरता होती. खूप प्रेमवीरांना तर प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्गच सापडायचा नाही, मग कुणी गुपचूप ‘तिच्या’ बेंचवर किंवा फळय़ावर वात्रट ओळी लिहि‌णार, तिच्या यायच्या रस्त्यावर शाळेतून चोरलेल्या खडूने बदामाच्या आकारात तिचं नाव लिहि‌णार, फार फार तर तिच्या गल्लीत दिवसातून सायकलवर पाचसहा चकरा मारणार. तरीही डाळ नाही शिजली तर मग थेट प्रप्रोज करणार. एकदा का तिकडून ग्रीन सि‌ग्नल मि‌ळाला की तो आणि ती एकमेकाला असं काही जपायचे की बस्स, अब सब कुछ तेरे लिए…

ज्यांनी आयुष्यात कधीतरी प्रेम केलेलं असेल, कुठेतरी, कुणीतरी मनात भरलं असतं अशी व्यक्ती ओळखणं फार अवघड नसतं. पहिला पाऊस पडण्याआधी गार वारा सुटला की घर, ऑफिस, हॉटेल, प्रवासात कुठेही असले तरी ही मंडळी खिडकीत जाऊन अगदी शून्य नजरेने त्या वाऱयाचा आस्वाद घेतात. मग जसजसा पाऊस बरसतो तसतसे हे त्या दिवसांत रमतात, आजूबाजूला कुणी नसलं तर ओठांवर एखादी कवि‌ता, गाण्याची ओळ अगदी सहज येते. एवढंच कशाला जेव्हा जेव्हा पानगळ होते तेव्हा तेव्हा हे ‘जख्मी दिल’ भर उन्हात त्या पि‌वळय़ा पानांकडे मोठय़ा आसुसलेल्या नजरेनं पाहतात. मग हळूच त्याच्या किंवा तिच्या आठवणींचा कप्पा उघडला जातो, त्यात आणखी भर टाकण्यासाठी लता, रफीचं दर्दभरे गीत टय़ून केलं जातं, ते जपून ठेवलेलं पत्र, जुन्या पि‌वळसर झालेल्या कागदात दुमडून ठेवलेला तो पासपोर्ट साइजचा फोटो…असं सगळं जसजसा पावसाचा जोर वाढतो तसतसं बाहेर येतं. तिची आणि त्याची ती पहिली भेट, सोबत घेतलेला तो पहिला चहा, तो बसप्रवास, अभ्यासाच्या वहीत जाळी होईपर्यंत जपून ठेवलेलं ते पिंपळाचं पान, हे सगळं आठवतं.

पहिलं प्रेम प्रत्येकालाच आयुष्यभरासाठी मिळालेलं नसतं. कधी ‘तो’ समाजाच्या रुढी परंपरांमध्ये अडकतो तर कधी ‘ती’ चुकीचं पाऊल टाकायचं नाही अशी खूणगाठ बांधून त्याचा निरोप घेते, कधी एकमेकांचं वय आडवं येतं, तर कधी जात. मात्र तरीही ‘तो’ आणि ‘ती’ जेथेही असतील तेथे कधीतरी कातरवेळी एकमेकांना साद घालतात. तर काहींचं पहिलं प्रेम पत्नी, पती म्हणून सोबतच असल्याने त्यांच्या आठवणींचा हिंदोळा तर बहरत जातो.

Related posts: