|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » शरद पवारांची पुन्हा दादा घराण्यावर तोफ

शरद पवारांची पुन्हा दादा घराण्यावर तोफ 

प्रतिनिधी / मिरज

माझ्या मतदार संघात मी नसेल तर दुसरा कोणीही याठिकाणाहून निवडून येता कामा नये, ही भुमिका स्थानिक नेत्यांनी घेतल्याने सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना पराभव पत्कारावा लागला. असा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते, माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी गुरूवारी पुन्हा दादा घराण्यावर तोफ डागली. राज्यात बऱयाच ठिकाणी असे प्रकार निदर्शनास आल्याचेही ते म्हणाले.

शहरातील गुलाबराव पाटील मोमोरीयल ट्रस्टच्या रौफ्यमहोत्सवी सांगता समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री, काँगेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे होते. ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असतानाही त्यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदार संघातून पराभव पत्कारावा लागला, असे सुतोवाच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केले होते. शरद पवार यांनी हाच धागा पकडत सदरच्या पराभवास अप्रत्यक्षपणे दादा घराणे जबाबदार असल्याचे आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

Related posts: