|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि.प.उत्पन्नवाढीसाठी ‘मास्टर प्लॅन’

जि.प.उत्पन्नवाढीसाठी ‘मास्टर प्लॅन’ 

 

समिधा नाईक यांची माहिती : विश्रामगृहे देणार भाडय़ाला : तलावांचा वापर पर्यटनासाठी

प्रतिनिधी /  सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी जि. प. ची विश्रामगृहे भाडय़ाने देणे, व्यापारी गाळे बांधणे, सिंचन तलावे मत्स्य व्यवसाय व पर्यटनासाठी बोटिंग करण्याकरिता देणे, त्याशिवाय विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जि. प. अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर, जि. प. सदस्य विष्णूदास कुबल उपस्थित होते.

उत्पन्नवाढीचे विविध उपाय

सिंधुदुर्ग जि. प. चा अर्थसंकल्प 20 ते 22 कोटीपर्यंत जातो. परंतु या उत्पन्नात अपेक्षित योजना जि. प. मार्फत राबविता येत नाहीत. जि. प. चे उत्पन्न वाढले पाहिजे. त्यासाठी जि. प. मार्फत उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलली जात असून मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. त्याकरिता उत्पन्नवाढीचे विविध उपाय शोधण्यात आले आहेत, असे जि. प. अध्यक्षा म्हणाल्या.

विश्रामगृहे भाडय़ाने

जि. प. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने विशेषत: जि. प. ची विश्रामगृहे भाडय़ाने वापरास दिली जाणार आहेत. तसेच जागेच्या उपलब्धतेनुसार इतर कार्यालयांना जागा भाडय़ाने देण्यात येणार आहेत. जिल्हय़ातील प्रमुख मार्गावर जि. प. च्या जागेमध्ये होर्डिंग्ज लावण्यासाठी खासगी कंपन्यांना जागा भाडय़ाने दिली जाणार आहे.

व्यापारी गाळे बांधणार

जि. प. च्या आवारामध्ये प्राधिकरण समितीच्या मान्यतेने व्यापारी गाळे बांधले जाणार आहेत. जि. प. च्या अखत्यारित असलेले सिंचन, पाझर व साठवण तलाव मत्स्य व्यवसाय व पर्यटनाच्या दृष्टीने तलावांतर्गत बोटिंगसाठी भाडय़ाने दिली जाणार आहेत. जि. प. च्या सर्व विभागांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वत:ची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. जि. प. मालकीची बायो मेडिकल वेस्ट प्लॅन्ट तयार करण्यासाठी आवश्यक माहितीचा अहवाल तयार करून त्यासाठी आवश्यक अनुदान जिल्हा नियोजनच्या फंडातून घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

22 फेब्रुवारीला बैठक

देवगड प्रादेशिक नळयोजना विस्तारीकरण, जलसाठा वाढ करण्याचे धोरण ठरविण्यात येणार आहे. तसेच ही योजना सक्षमतेने सुरू राहण्यासाठी सर्व सहमतीने पाणीपट्टीबाबत धोरण निश्चित करण्यासाठी या भागातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या समवेत 22 फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आमदार नीतेश राणे मार्गदर्शन करणार आहेत. अशा पद्धतीने जि. प. उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना आखल्या असून अजूनही काही उपाययोजना सुचविल्या गेल्यास त्याचा विचार केला जाईल. जि. प. उत्पन्न वाढीमुळे लोकांसाठी अधिक सक्षमपणे योजना राबविल्या जातील, असे जि. प. अध्यक्षांनी स्पष्ट केले.

 जि. प. कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी

जि. प. कर्मचाऱयांसाठी लवकरच आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत केली जाणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये दंतचिकित्सा, स्त्राr-रोग तपासणी, क्लिनिकल बेस्ट कॅन्सर, डायबेटीस व रक्त चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती जि. प. अध्यक्षांनी दिली.

Related posts: