|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » क्रिडा » सचिन-लारा यांच्यात पुन्हा लढत

सचिन-लारा यांच्यात पुन्हा लढत 

वृत्तसंस्था / मुंबई :

अन ऍकेडमी रोड सेफ्टी टी-20 विश्व क्रिकेट मालिकेत जगातील दोन माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विंडीजचा ब्रायन लारा यांच्यातील पुन्हा लढतीची चुरस पाहावयास मिळणार आहे. या स्पर्धेत माजी ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सहभाग होणार आहे.

इंडिया लिजेंटस् आणि विंडीज लिजेंटस् यांच्यातील टी-20 क्रिकेट सामना 7 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. सचिन तेंडुलकर इंडिया लिजेंसटस् तर ब्रायन लारा विंडीज लिजेंटस् संघातून खेळणार आहे. या टी-20 विश्व क्रिकेट मालिकेत एकूण 11 सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, विंडीज, दक्षिण आफ्रिका देशांतील माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

भारतातर्फे सचिन तेंडुलकर, सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, विंडीजतर्फे ब्रायन लारा, शिवनरेन चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचे  बेट ली, ब्रॅड हॉज, दक्षिण आफ्रिकेचा जाँटी ऱहोडस्, लंकेतर्फे मुरलीधरन, टी. दिलशान आणि ए. मेंडीस सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्यातील स्टेडियमवर, चार सामने नव्या मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना 22 मार्च ब्रेबॉन स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील सामने सायंकाळी सात वाजता सुरू होतील. सचिन तेंडुलकर इsंडिया लिजेंडस् संघाचे नेतृत्व करणार आहे.

 

Related posts: