|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » solapur » ढवळस येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

ढवळस येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या 

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यातील ढवळस येथील बारावी मध्ये शिक्षण घेणारा मनोज जोतिराम दबडे (वय १८) याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून स्वतःच्याच शेतात आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी साडे आठच्या पूर्वी त्यांच्याच गावच्या शिवारातील खरबुजाच्या शेताजवळ घडल्याचे उघडकीस आले.

याबाबत साधना मारुती दबडे यांच्या खबरीवरून कुर्डुवाडी पोलिसात आकस्मित मृत्यू म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून ढवळस गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्यात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

Related posts: