|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सिलीडरच्या किंमती वाढल्याने गोवा प्रदेश महिला कॉंगेसतर्फे सरकारचा निषेध

सिलीडरच्या किंमती वाढल्याने गोवा प्रदेश महिला कॉंगेसतर्फे सरकारचा निषेध 

प्रतिनिधी / पणजी :

घरघुती गॅस सिलीडरच्या किंमती पुन्हा 145 रुपयांनी वाढल्याने गोवा प्रदेश महिला कॉगेसतर्फे काल पणजी मार्केटमध्ये सरकारचा निषेध करण्यात आला. सरकारने आत्याआवश्यक अशा वस्तूच्या किंमतीवाढवून सर्वसामान्य लोकांना  महगाईत ढकलेले असल्याच अरोपही यावेळी करण्यात आला.

कॉग्रेस सरकारच्या काळात 300 ते 350 रुपयांनी मिळणारा गॅस सिलीडर आता 900 ते एक हजार रुपया पर्यत पोहचला आहे. या सरकारने आवश्यक सर्व वस्तूच्या किमती वाढविल्या आहे. भाजपने लोकांची फसवणूक केली आहे. या अगोदरही कांदा, नारळ अशा गरजू वस्तूच्या किमती वाढल्या होत्या आता गॅस सिलींडर महागल्याने सर्व सामान्यांना फटका बसला आहे. सरकारने या वाढविल्याला किमती ताबडतोब मागे घ्याव्या. तसेच सरकारने गोमंतकीयांना  अनुदानित गॅस सिलींडर द्यावे, अशी मागणी महिला काँगेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी सागितले.

हे सरकार महिलांना गृह आधार देते तर दुसऱया बाजूनी त्यांच्याकडून पैसे लुबाडत आहे. आज सर्वसामान्य महिलांना घर चालविणे कठीण झाले आहे. आता गॅस महाग झाल्याने महिलांचा बजेट कोलमोडला जाणार आहे. हे सरकार महिलांना  पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आणत आहे. भाजप महिलांनी या वाढत्या महागाई विरोधात रस्त्यवर येणे गरजेच आहे. या भाजप महिर्लंना सर्व समान्य जनतेचे काहीच पडले नाही असा अरोपही यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांनी केला.

यावेळी मोटय़ा प्रमाणात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पणजी मार्केटमध्ये जमा झाल्या होत्या. यावेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच सरकारचा  निषेध करण्यात आला.

 

Related posts: