|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » रेल्वेत बसण्याच्या वादातून तरुणाची हत्या, आरोपी अटकेत

रेल्वेत बसण्याच्या वादातून तरुणाची हत्या, आरोपी अटकेत 

 पुणे / प्रतिनिधी :

रेल्वेत बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून 12 जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेसमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला. मारहाण करणाऱयांमध्ये सहा महिलांचादेखील समावेश असून, पुणे-दौंड या रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर मरकड असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर हा पत्नी ज्योती, आई व दोन वर्षांच्या मुलीसह एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. साधारण दुपारी पावणे एकच्या सुमारास पुणे स्थानकात ते चढले. त्यावेळी गाडीच्या जनरल डब्यात प्रचंड गर्दी होती. बसायलादेखील जागा नव्हती. सागरने एका सीटवर बसलेल्या महिलेला थोडे सरकायला सांगितले. परंतु, त्या महिलेने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सहा महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहा पुरुषांनी सागरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सागरच्या कुटुंबीयांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी मारहाण सुरूच ठेवली. यामध्ये जखमी सागरचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

 

Related posts: