|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » हायप्रोफाईल हवाई चोराकडून 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

हायप्रोफाईल हवाई चोराकडून 37 लाखांचा मुद्देमाल जप्त 

चोराकडून 127 गुन्हे उघड

पुणे / वार्ताहर :

मूळच्या हैदराबाद येथील व मुंबईत स्थायिक झालेल्या उच्चभ्रू राहणीमान असलेल्या आरोपीने विविध राज्यांत हवाईसफर करीत तेथील उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकांमध्ये साथीदारांसह वेळोवेळी डल्ला मारल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या चोराचे पुणे शहरातील 82 चोरींसह तब्बल 127 गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून तब्बल 37 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुन्ना उर्फ सलीम कुरैशी (वय 46, रा. गोवंडी, मुंबई, मूळ रा. हैदराबाद) असे अटक केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. याबरोबरच चोरी केलेला माल विक्री करणाऱया शरीफ मोहम्मद ख्वाजा मैनुद्दीन शेख, बिलाल उर्फ अशोक गोविन्द प्रधान, अब्दुल सत्तार मोहम्मद नजीर अहमद सत्तार, मोघल अन्वर अली करीम बेग, प्रभू कल्लापा नजवंडे (सर्व रा. हैदराबाद) यांनाही अटक करण्यात आली आहे.

सलीम हा मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. तो विमानाने किंवा त्याच्या आलीशान कारने पुण्यात येत असे. त्यानंतर ईश्वर शिंदवळ यास जोडीला घेऊन शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकामध्ये चोरी करीत असे. कुरेशीने  पुण्यात 82 चोरीचे गुन्हे केले. उर्वरित 47 गुन्हे मुंबई, दिल्ली व हैदराबाद येथील आहेत. त्यांच्याकडून 830 ग्रॅम सोने, 6 किलो 275 ग्रॅम चांदीसह 37 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related posts: