|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » मनसेची घुसखोरांबद्दलची भूमिका सुरूवातीपासूनच : राज ठाकरे

मनसेची घुसखोरांबद्दलची भूमिका सुरूवातीपासूनच : राज ठाकरे 

 ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

भूमिका बदलून अनेक जण सत्तेत आले. मनसेने फक्त झेंडा बदलला आहे, भूमिका सुरूवातीपासून तीच आहे. घुसखोरांना सुरुवातीपासूनच मनसेचा विरोध होता. तसेच धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी आज पत्रकारांशी अनैपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, मागील चार वर्षापूर्वीच मी मनसेचा नवीन झेंडा आणला होता. तो यंदा अधिकृत करण्याचा निर्णय झाला. मनसेची भूमिका सुरूवातीपासून तीच आहे. घुसखोरांबाबत मनसे मागील 14 वर्षांपासून आवाज उठवत आहे. हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱया हिंदुत्त्वावाद्यांनी एकदा तरी मोर्चा काढला का, असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.

औरंगाबादमध्ये विकासाबरोबरच चांगले बदल झाले पाहिजेत. तसेच औरंगाबादाचे नाव बदलले तर काय हरकत आहे, असे म्हणत त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचीही मागणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

 

 

Related posts: