|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देताना रोहित पवारांचा मोदी सरकारला टोला

‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देताना रोहित पवारांचा मोदी सरकारला टोला 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

संपूर्ण जगभरात आज व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा केला जातो. अनेकजण आपल्या प्रेमाची कबुली आजच्या या खास दिवशी देतात. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही आजचा हा दिवस खास पद्धतीने साजरा केला आहे.

रोहित पवार यांनी एक ट्विट करत ‘व्हॅलेंटाईन डे’ शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हा दिवस स्वच्छ व खऱया अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱयांचा आहे’ असं म्हणत नंतर त्यांनी केंद्र सरकारला चांगलाच टोला लगावला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आजच्या प्रेमाच्या दिवशी सगळेजण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आवडत्या गोष्टी करतं. पण तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असू द्या… गॅसचा दर 910 रुपये प्रती सिलिंडर झाला आहे.

दरम्यान, इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. यावरूनच रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

 

Related posts: