|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » leadingnews » निर्भया: ‘विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त’

निर्भया: ‘विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला विनय शर्मा याची आणखी एक याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. आपण मानसिकदृष्टय़ा आजारी असल्याचे सांगत आपल्याला फाशी देऊ नये अशी मागणी विनयने सुप्रीम कोर्टात केली होती.

सुप्रिम कोर्टाने या विषयावर निकाल देताना म्हटले आहे की, विनय हा शारिरिकदृष्टय़ा सुदृढ आहे व मानसिकदृष्टय़ा ठीक आहे. असे कारण देत त्याची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, या प्रकरणी चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुकेश सिंह, पवनकुमार गुप्ता, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या दोषींची नावे आहेत. त्यापैकी विनय शर्मा याने याआधी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. तीही यापूर्वीच फेटाळण्यात आली होती.

 

Related posts: