|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » कोरोना : चीनमध्ये मृतांची संख्या 1500 वर

कोरोना : चीनमध्ये मृतांची संख्या 1500 वर 

 ऑनलाईन टीम / बिजींग :

कोरोना या जीवघेण्या विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 1500 हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. तर या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 60 हजारांहून जास्त आहे. चीनच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

चीनमधील 31 प्रांतात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या 60 हजारांवर पोहचली आहे. बुधवारी 242 तर गुरूवारी 254 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 15 हजार 152 नवीन कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. 8000 हून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. चीनसह इतर 25 देशात या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

चीनमध्ये रुग्णालयांची संख्या अपुरी असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वटवाघळांतून मानवापर्यंत खवल्या मांजरामुळे झाला असावा, असा चिनी संशोधकांचा अंदाज आहे. तसा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आतंरराष्ट्रीय तज्ञांचे 15 जणांचे पथक चीनमध्ये दाखल आहे. करोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी हे पथक चीनच्या आरोग्य विभागाला मदत करणार आहे.

कोरोनाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. चीनमधून येणारे सुटे भाग मिळत नसल्याने विविध कंपन्यांनी उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts: