|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रतिष्ठानच्या नाट्यउत्सवाने नाट्य रसिकांमध्ये प्रगल्भता : कादंबरीकर बांदेकर

प्रतिष्ठानच्या नाट्यउत्सवाने नाट्य रसिकांमध्ये प्रगल्भता : कादंबरीकर बांदेकर 

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी

शफाअत खान हे मराठीतील महत्वाचे नाटककार आहेत. त्यांची लेखन संवेदनशीलता ही आमच्याच पिढीची संवेदनशीलता आहे. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यउत्सवाने नाट्य रसिकांमध्ये प्रगल्भता निर्माण केली. अशा मंचावर शफाअत खान यांच्यासारख्या नाटककराच्या नाट्य ग्रंथाचे प्रकाशन होत आहे ही महत्त्वपूर्ण घटना असल्याचे प्रतिपादन नामवंत कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले.

शहरातील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 28 व्या प्रायोगिक नाट्यउत्सवाचा समारोप काल, बुधवारी रात्री प्रतिष्ठानच्या येथील रंगमंचावर डॉ. आशुतोष दिवाण लिखित आणि अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित घटोत्कचनाटकाच्या प्रयोगाने झाला. त्तपूर्वी पंडित पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या शफाअत खान यांच्या , किस्से एक, किस्से दोन, ड्राय डेया नाटकांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रा. बांदेकर आणि कवी अजय कांडर यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना बांदेकर यांनी, शफाअत खान हे आधुनिक रंगभूमीवरील महत्वाचे नाटककार असल्याचे आवर्जून नमूद केले. यावेळी आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, कार्याध्यक्ष नारायण देसाई, कार्यवाह शरद सावंत इतर पदाधिकारी प्रा. डॉ. अनिल फराकटे, राजा राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.

श्री कांडर म्हणाले, शफाअत खान,प्रेमानंद गज्वी,जयंत पवार, मकरंद साठे हे समकालीन नाटकाकर. खान यांचे शोभायात्रा हे नाटक प्रतिष्ठानच्या रंगमंचावर सादर झाले त्याच बरोबर जयंत पवार यांचे टेंशेनच्या स्वप्नात ट्रेन, मकरंद साठे यांचे चौक, प्रेमानंद गज्वी यांचे पाणी अशी नाटकं सादर झाली. आणि त्याच मराठी नाटकारांच्या नाट्य ग्रंथांच प्रकाशन कणकवलीतील पंडित पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आले. ही खूप चांगली घटना आहे. माणसाला प्रश्न पडावे लागतात आणि त्या काळाचे प्रश्न तुमच्या मनात चांगलं नाटक पाहून उपस्थित होत असतात. असं काम 28 वर्ष प्रतिष्ठानच्या रंगमंचावर सादर झालेल्या उत्तम प्रयोगिक नाटकांनी केलं.

वामन पंडित म्हणाले, बांदेकर, कांडर हे दोन आजच्या मराठी साहित्यातील महत्त्वाचे साहित्यिक आहेत. त्यांच्या हस्ते पंडित पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या नाट्य ग्रंथाचे प्रकाशन होत आहे ही चांगली घटना मी मानतो. शफाअत खान यांचं संस्थेशी स्नेहाचं नात आहे. संस्थेच्या रंगवाचानाट्यविषयक नियतकालिकात त्यांचं सदर चालू आहे. अशा नाटक नाटककाराचे पुस्तक प्रकाशित करताना आनंद होत आहे. नाट्यरसिकांनीही अशा लेखन कृतीला चांगला प्रतिसाद द्यायला हवा. प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts: