|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » मराठवाडा दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे उद्या मुंबईत परतणार

मराठवाडा दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे उद्या मुंबईत परतणार 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : 

मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांचा मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार आहेत. त्यांचा दौरा तीन दिवसांचा होता. मात्र ते उद्या सकाळीच मुंबईमध्ये परतणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरे काल संध्याकाळी औरंगाबादला पोहोचले. ते 16 फेब्रुवारीला मुंबईला परतणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ते उद्या सकाळीच मुंबईत परतणार आहेत. राज यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मात्र यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ते शिक्षकांच्या संमेलनादेखील उपस्थित राहणार होते. याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनादेखील भेटणार होते.

 

Related posts: