|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार ?

औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार ? 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

औरंगाबादकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही सरप्राईज देतील. असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘औरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं’.कोणत्याही क्षणी मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादकरांना मोठे सरप्राटईज मिळू शकते. तसेच असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही असंही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची भूमिका घेतली आहे. याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, राज ठाकरे हे आत्ता मागणी करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 1988 पासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच उल्लेख करत आहेत. शिवसेनेनेच ही मागणी कायम लावून धरली होती. औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवलं जावं हे तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे ते स्वप्न उद्धव ठाकरेच पूर्ण करतील. 

Related posts: