|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » खंडपीठप्रश्नी मी कोल्हापूरच्या बाजूने : शरद पवार 

खंडपीठप्रश्नी मी कोल्हापूरच्या बाजूने : शरद पवार  

प्रतिनिधी / कोल्हापूर

खंडपीठासाठी कोल्हापूर आणि पुणे येथून मागणी केली जात आहे. मात्र मुंबईतील काही वकिलांचा या मागणीला विरोध आहे. पण खंडपीठाच्या या मागणीत मी कोल्हापूरच्या बाजूने आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. त्यासाठी आंदोलनेही सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हय़ातील पक्षकारांना कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास लाभ होणार आहे. त्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारिरीक त्रास कमी होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपीठ समितीच्या वतीने सातत्याने आंदोलने सुरू आहे. पवार यांना कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीविषयी विचारले असता ते म्हणाले, खंडपीठासाठी कोल्हापूरबरोबर पुणेही मागणी करत आहे. पण मुंबईतील काही वकिलांचा कोल्हापूर किंवा पुण्यात खंडपीठ होण्यास विरोध आहे. या मागणीबाबत मी कोल्हापूरच्या बाजूने आहे. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल.

बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली पवारांची भेट

दरम्यान, पवार कराडला रवाना होण्यापूर्वी विविध संस्था, संघटनांच्या शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेवून निवेदने सादर केली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष ऍड. रणजित गावडे याच्या नेतृत्वाखाली पवार यांना निवेदन देवून चर्चा केली. 

Related posts: