|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहला आंतरराष्ट्रीय पुरस्कार 

ऑनलाईन टीम/नवी दिल्ली

भारतीय पुरूष हॉकी टीमचा कर्णधार मनप्रीत सिंह याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा (एफआईएच) या वर्षीचा सर्वाकृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा मनप्रीत सिंह हा पहिला भारतीय खेळाडू आहे. 1999 ला या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.

बेल्जियमच्या आर्थर वॉन डोरेन आणि अर्जेटीनाच्या लुकास विला हे दुसर्‍या आणि तीसर्‍या स्थानावर आहेत. राष्ट्रीय संघ, मीडिया, प्रशिक्षक आणि खेळाडूच्या संयुक्त मते मनप्रीत याला 35.2 मते मिळाली. तर वॉन डोरेनला 19.7 तर विलाने 16.5 मते मिळवली.

लंडन 2012 आणि रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या 27 वर्षीय मनप्रीतने 2011मध्ये सीनिअर राष्ट्रीय टीममध्ये पदार्पण केले होते. भारतीय संघाकडून त्याने आतापर्यंत 260 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Related posts: