|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मानिनी यात्रेच्या माध्यमातून बचत गट सक्षम होतील : बाळासाहेब पाटील

मानिनी यात्रेच्या माध्यमातून बचत गट सक्षम होतील : बाळासाहेब पाटील 

प्रतिनिधी / सातारा

जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित जत्रेच्या माध्यमातून बचत गट सक्षम होतील. बचत गटांना बाजारपेठ मिळत राहिली तर आर्थिक उन्नती पूर्णांशाने होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. जिल्हास्तरीय स्वयंसहाय्यता समुह निर्मिती उत्पादनांची मानिनी जत्रा 2020 आणि राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, कृषी सभापती मंगेश धुमाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक अविनाश फडतरे तसेच पुणे येथील उपायुक्त सीमा जगताप उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, “गतिमान युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या प्रचंड मेहनतीने चांगल्या वस्तू निर्माण करीत आहेत. खाद्यपदार्थ तयार करीत आहे यासाठी चांगले व्यापारी केंद्र म्हणून अशा जत्रा मोठी बाजारपेठ आहेत.आर्थिक विकासात बचत गटांचे मोठे योगदान आहे.सहकारातून बचत गटांची निर्मिती झाली व इतरांसाठी एकत्र येणे हे बचत गटांचे मुख्य सूत्र आहे. बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करेल. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बचत गटांना यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. तसेच ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे पाटील म्हणाले.

Related posts: