|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » विविधा » … त्यांनी सांगितले लव्ह युअरसेल्फ फर्स्ट

… त्यांनी सांगितले लव्ह युअरसेल्फ फर्स्ट 

ऑनलाईन टीम / पुणे : 

अनिच्छेनेच देहविक्रीच्या व्यवसायात उतरलेल्या त्या…त्यांच्या दैंनदिन जीवनात वावरताना प्रेम या भावनेला त्यांनी कितीतरी मैल दूर ठेवलेले असते, किंबहुना ती भावनाच त्यांच्यापर्यंत कधी पोहोचत नाही…परंतु आज त्यांनी ठरविले प्रेमाचा दिवस साजरा करायचा… कुणासाठी नाही तर स्वत:साठी, स्वत:सोबत…आणि त्यांनी स्वत:लाच पॅम्पर करीत उत्साहाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. दुसºयावर प्रेम करण्यासोबत स्वत:वर देखील प्रेम करा असे सांगितले. यावेळी महिलांनी एकमेकींना चॉकलेट आणि फुले देत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

बुधवार पेठेतील सहेली संघ या संस्थेत व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून लव्ह युअरसेल्फ या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम स्वयंसहाय्यता गटांमध्ये राबविण्यात आला. यावेळी सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी व संस्थेतील स्वयंसेवक उपस्थित होते. आपण दुसºयासाठी जगताना स्वत:वर देखील प्रेम करणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व देहविक्री करणाºया महिलांना यावेळी सांगण्यात आले. तसेच अ‍ॅम्प्लिफायर चेंज प्रकल्पांतर्गत आजच्या जीवनात मानसिक आरोग्य आणि समुपदेशन या विषयावर चर्चा करण्यात आली.

तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, मागील अनेक वर्षांपासून देहविक्री करणा-या महिलांसोबत आम्ही काम करीत आहोत. या महिलांचे आयुष्य अतिशय खडतर असते. त्यांच्या आयुष्यात प्रेमाला स्थान नसते. त्यामुळे आपण आधी स्वत:वर प्रेम करायला हवे, स्वत:ची काळजी घ्यायला हवी, हे सांगण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी देखील उपक्रमाला प्रतिसाद देत अतिशय उत्साहात व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

Related posts: