|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » सांगलीच्या महापौरांची बेळगाव तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट

सांगलीच्या महापौरांची बेळगाव तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट 

प्रतिनिधी /बेळगाव 

 सांगली महानगरपालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी शुक्रवारी बेळगावला धावती भेट दिली. त्यावेळी त्यांनी  तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली तरुण भारत परिवारातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. तरुण भारतच्या कार्यालयात त्यांनी संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच त्यानंतर झालेल्या गप्पा-टप्पांच्या कार्यक्रमात भाग घेतला. सांगलीच्या नवनिर्वाचित महापौर गीत सुतार या एका घरगुती विवाह सोहळ्याच्या निमित्ताने बेळगावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.  संपादक जयवंत मंत्री, सीईओ दीपक प्रभू आणि परिवारातील इतर सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. या त्यांच्या भेटीप्रसंगी त्यांनी आपण सांगली येथील रहिवाशांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक विजय भोसले, राजू बिर्जे मनोहर हलगेकर ,राकेश पलंगे, सामाजिक कार्यकर्ते रवी साळुंखे, सुभाष हदगल उपस्थित होते.

Related posts: