|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » कळवा : रेल्वेरुळाजवळच्या कचऱयाला आग, धीम्या मार्गावरील वाहतूक बंद

कळवा : रेल्वेरुळाजवळच्या कचऱयाला आग, धीम्या मार्गावरील वाहतूक बंद 

ऑनलाईन टीम / ठाणे : 

ठाण्याच्याजवळ असलेल्या कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेल्या कचऱयाला आग लागल्याची घटना आज घडली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कल्याणदरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे.

संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने घरी निघालेल्या चाकरमान्यांचा मोठय़ा प्रमाणावर खोळंबा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचा एक बंब दाखल झाला आहे. अंडरग्राऊंड केबलमधून ठिणग्या उडाल्या आणि ही आग लागली आहे. ही आग लागल्यानंतर ट्रकजवळ असलेल्या कचऱयानेही पेट घेतला.

 

 

Related posts: