|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » वडगाव येथे युवकावर कोयत्याने हल्ला

वडगाव येथे युवकावर कोयत्याने हल्ला 

बेनकनहळ्ळी येथील तरुणाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव

वैयक्तिक कारणावरुन अनगोळ येथील एका सेंटरिंग कामगारावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी येळ्ळूर रोड, वडगाव येथे ही घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बेनकनहळ्ळी येथील एका तरुणाला अटक केली आहे.

किशोर बाळकृष्ण हसबे (वय 40, रा. अनगोळ) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला तातडीने खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून खासगी कारणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अभिषेक नामदेव औंदकर (वय 26, रा. बेनकनहळ्ळी ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे. अभिषेकने शुक्रवारी दुपारी येळ्ळूर रोड, वडगाव येथे किशोरला बोलावून त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.

Related posts: