|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एसपीएम रोडची समस्या जैसे थे च

एसपीएम रोडची समस्या जैसे थे च 

एसपीएम रोडवर चिखलात अडकला डंपर

 बेळगाव / प्रतिनिधी

    एसपीएम रोडवरील समस्या कही सुटताना दिसत दिसत नाहीत. शुक्रवारीही या रस्त्यावर एक डंपर अडकला. त्यामुळे वाहन चालकांनी वाहने चालवाची तरी कशी ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वाहने अडकल्याने रोजच्याच वाहतूक कोंडीने नागरीक हैराण झाले आहेत.

बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते कपिलेश्वर उड्डाणपूल पर्यंत नेहमीच वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा लागत आहेत. दुसर्‍या बाजूच्या कामासाठी दिरंगाई होत असल्यामुळे ही कोंडी होत आहे. दुसर्‍या बाजूला ड्रेनेज पाईपलाईन घालण्याकाfरता काहि ठिकाणी खोदाई करण्यात आली होती. त्या ठिकाणी चिखल होवून वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत.

मागील आठवडाभरात 5 ते 6 वाहने या चिखलामध्ये अडकली आहेत. वाहने काढण्यासाठी झालेल्या चिखलामुळे पुन्हा दुसरी वाहने अडकली जात आहेत. अवजड वाहने त्यामध्ये अडकत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले असून दुसर्‍या बाजूच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाला सुरूवात करण्याची मागणी होत आहे.

Related posts: