|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » उद्योग » मार्चमध्ये ‘ओप्पो रेनो-3 प्रो’ होणार सादर

मार्चमध्ये ‘ओप्पो रेनो-3 प्रो’ होणार सादर 

स्मार्टफोन भारतात दाखल करण्यासाठी कंपनीची तयारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओप्पो कंपनी आपला रेनो सीरीजचा नवीन स्मार्टफोन ‘रेनो 3 प्रो’ हे मॉडेल येत्या दोन मार्च रोजी भारतात सादर करण्याच्या तयारीत आहे. भारतामध्ये सादर होणारा 44 मेगापिक्सलचा डब्बल होल पंचचा कॅमेरा असणारा पहिलाच फोन ठरणार आहे. कंपनीने  15 सेकंदाचा एक टीजर ही सादर केला आहे. ओप्पो ने हा स्मार्टफोन मागील वर्षात चिनी बाजारात सादर केला होता.

रेनो 3 प्रो (चीन)

आप्पोच्या रेनो 3 प्रो या मॉडेलला चीनमध्ये 5 जी नेटवर्क सपोर्टसोबत सादर करण्यात आला होता. यामध्ये स्नॅपड्रगन एक्स52 5 जी मॉडेल दिले होते. भारतामध्ये मात्र सादरीकरण 4 जी नेटवर्क सपोर्टसोबत सादर करण्यात येणार आहे.

सुविधा

डिस्प्ले : 6.5 इंच एमोलेड टचस्क्रीन

रिझोलेशन : 1080x  2400 पिक्सल

ओएस अँड्राईड : 10.0 कलर ओएस 7

रॅम : 8 जीबी /12 जीबी

स्टोरेज : 128 जीबी /256 जीबी

रियर कॅमेरा 481382 एमपी

फ्रन्ट कॅमेरा :
442 एमपी

बँटरी : 4025एमएएच नॉन रिमूव्हेबल

Related posts: