|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीत फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन

आंबोलीत फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन 

वार्ताहर / आंबोली:

येथील वनउद्यानातील फुलपाखरू उद्यान आणि वनविभागाच्या रेस्ट हाऊसचे उद्घाटन वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक जालगावकर, वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, आंबोली सरपंच रोशनी पारधी, माजी सरपंच शशिकांत गावडे, उपसरपंच विलास गावडे, बबन गावडे, अरुण गावडे, काशिराम राऊत, जगन्नाथ गावडे, दीपक मेस्त्राr, हेमंत ओगले, हेमंत नार्वेकर, नाना आवटे, काका पावसकर, वनविभागाचे अधिकारी सर्जेराव सोनवडेकर, अमृत शिंदे, दयानंद कोकरे, वनपाल वसंत चाळके, वनरक्षक पी. एन. प्रताप, दयानंद शिंदे, वनरक्षक मायनीकर, वनपाल आरेकर, बाळा गावडे, मंगेश सावंत, नामदेव गावडे, बाळा गावडे, एकनाथ गावडे, एकनाथ पारधी, अशोक गावडे आदी उपस्थित होते.    

आंबोली फुलपाखरू उद्यानासाठी 42 लाख मंजूर असून त्यातील 19 लाख खर्च करण्यात आले आहेत. सहा लाख वॉटर स्प्रिंकलिंग करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम मेंटेनन्ससाठी वापरण्यात येणार आहे. आंबोलीतील  वनजमिनीसंदर्भात  चौकशी  करून  योग्य  तो  निर्णय  घेण्यात  येईल, असे राठोड यांनी सांगितले.

Related posts: