|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » उद्योग » ‘कल्याणी समूहा’कडून 5 सामंजस्य करार

‘कल्याणी समूहा’कडून 5 सामंजस्य करार 

प्रतिनिधी / पुणे

भारतीय बनावटीची उत्पादने तयार करण्यासाठी आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा प्रसार करण्यासाठी कल्याणी समूहाने जागतिक संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादन कंपन्यांशी करार करत आपली प्रगतीशील विकास योजना जाहीर केली आहे. कल्याणी समूहाच्या प्रमुख कंपनीने विद्युतचंबुकीय आणि आधुनिक वीज व उर्जा तंत्रज्ञान अशा वैविध्यपूर्ण क्षेत्राशी संबंधित संशोधन, डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जनरल अटॉमिक्स, यूएस या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत बीएफएल आणि जनरस अटॉमिक्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम्स ग्रुप (जीए- ईएमएस) भारतीय संरक्षण दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जमीन आणि समुद्री नौदल प्लॅटफॉर्म्स शस्त्रास्त्रे यंत्रणा, प्लॅटफॉर्म्ससाठी आधुनिक प्रक्षेपण यंत्रणा यांच्याशी संबंधित उर्जा निर्मिती, साठवणूक, नियंत्रण आणि वितरण तंत्रज्ञान तयार करण्यासाठी व त्यांचा समावेश करण्यासाठी आवश्यक संधींचा शोध घेण्यात येणार आहे.

भारत फोर्ज लि.ने भारतीय नौदलातर्फे वापरल्या जाणाऱ्या टोर्पिडोज विकास, शिपबोर्न आणि सबमरीन प्लटफॉर्म्ससाठीचे आधुनिक होम हेड्स विकसित करणाऱ्या डॅस्टन समूह, किरगिझस्तान याच्य्ााशी सामंजस्य करार केला आहे. सीईटी- 65ई टोर्पिडोजचा विकास करण्यासाठी आणि भारत व इतर प्रदेशातील पाण्याअंतर्गत शस्त्रास्त्र यंत्रणा/उत्पादनाशी संबंधित एकत्रितपणे शोधण्यात आलेल्या व परस्पराना मान्य असलेल्या संधीमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही कंपन्यानी हा करार केला आहे.

Related posts: