|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » उद्योग » न्यायालयाच्या निर्णयानंतर बाजार घसरला

न्यायालयाच्या निर्णयानंतर बाजार घसरला 

सेन्सेक्स 202 अंकांनी तर निफ्टी 61.20 अंकांनी घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउताराचे वातावरण राहिले आहे. त्यामध्ये जगातिक पातळीवरील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग त्याचा व्यापार उद्योगासह अन्य उत्पादन क्षेत्रावर पडलेला प्रभाव आणि त्याचे अप्रत्यक्षपणे भारतीय शेअर बाजारावर झालेले  परिणाम या प्रवासातच आठवडा समाप्त झाला आहे.

चालू आठवडय़ात पहिल्या दिवशी घरसरण त्यानंतरचे दोन दिवस तेजी आणि अंतिम दोन दिवस पुन्हा घसरणीची नोंद करत बाजार बंद झाला आहे. अंतिम दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर 202.05 अंकानी घसरुन निर्देशांक 41,257.74 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 61.20 अंकाची घसरण होत निर्देशांक 12,113.50 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मोठय़ा प्रमाणात नुकसानीत राहिले आहेत. ही घसरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. एजीआर 1.47 लाख कोटी शुल्क जमा करण्यात संदर्भात शुक्रवारी दूरसंचार कंपन्या आणि दूरसंचार विभाग यांना न्यायालयाने फटकारले त्यानंतर मात्र शेअर बाजारातील दूरसंचार कंपन्यांचे समभाग घसरलेत. दुसरीकडे  डबघाईला आलेल्या कंपन्यांवर असणारे बँकांचे कर्ज असल्यामुळे बँकांही चिंतेत राहिल्या आहेत.

सेन्सेक्समधील 30 पैकी 22 आणि निफ्टीमधील 50 पैकी 35 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. यात बँकिंग,वाहन, एफएमसीजी, दूरसंचार क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात विक्री झाली आहे. यामुळे दूरसंचारचे समभाग 23 टक्क्यांनी घसरले आहेत. दुसरीकडे एनएसईमधील 11 क्षेत्राचा निर्देशांक नुकसानीत राहिला आहे. तर इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 4.38 टक्क्यांनी, स्टेट बँक 2.41 ,एचडीएफसी बँक 1.77 आणि ऍक्सिस बँक 1.5 टक्क्यांनी समभाग घसरल्याची नोंद केली आहे.

Related posts: