|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उचगाव रेल्वे पुलावर ट्रक पलटी

उचगाव रेल्वे पुलावर ट्रक पलटी 

वार्ताहर / उचगाव

पुणे बेंगलोर महामार्गावर उचगाव नजीक रेल्वे रुळाच्या बाजूस बगॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकची पुढील चाकाची धडी तुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकून पलटी झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली.

घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार, कागल हुन साताऱ्याकडे बगॅस घेऊन जाणारा ट्रक न एम एच 09 Q-६७४५ उचगाव नजीक रेल्वे पुलाच्या उड्डाणपूलावरून जाताना अचानक ट्रकच्या पुढील चाकाची धडी तुटल्याने चालक नंदकुमार भोरे रा.नरंदे हातकणंगले यांच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगवधान राखत ट्रक एका बाजूला घेण्याचा प्रयत्नात रेल्वे उड्डाणपूलावरील संरक्षक कठडा तोडून पलटी झाला.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक पलटी झालेने बघ्याची गर्दी झाली होती.तसेच सुमारे तासभर वाहतुक कोंडी झाली होती. रात्री 8 च्या दरम्यान क्रेन च्या साहाय्याने ट्रक काढण्यात आला.

Related posts: