|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » एर्डोगन यांच्याकडून काश्मीरचे तुणतुणे

एर्डोगन यांच्याकडून काश्मीरचे तुणतुणे 

इस्लामाबाद
 काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान एकाकी पडत असतानाच तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तईप एर्डोगन यांनी पाकिस्तानच्या संसदेत काश्मीर प्रश्न उकरून काढला आहे. याप्रश्नी तुर्कस्थान, पाकिस्तानच्या बाजूने उभा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. भारताने या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.

एर्डोगन सध्या दोन दिवसांच्या पाकिस्तान भेटीवर आहेत. चीन आणि तुर्कस्थान हे दोनच देश सध्या काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे उभे आहेत. इतर जवळपास सर्व देशांनी पाकिस्तानची साथ सोडली आहे. काश्मीर प्रश्न संघर्षाच्या माध्यमातून नव्हे तर न्यायाच्या आधारावर सोडविला पाहिजे. प्रश्न सोडविताना तेथील जनतेची आकांक्षा लक्षात घेतली पाहिजे. हा प्रश्न पाकिस्तानसाठी जितका संवेदनील आहे, तितकाच तो तुर्कस्थानसाठीही महत्त्वाचा आहे, अशी दर्पोक्ती त्यांनी केल्याचे वृत्त पाक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

काश्मीरमध्ये सध्या मानव अधिकारांची पायमल्ली होत आहे. तुर्कस्थानातही पहिल्या महायुद्धाच्यावेळी अशी स्थिती होती. त्यामुळे काश्मीरच्या जनतेबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, असे म्हणत त्यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.

भारताकडून निषेध

एर्डोगन यांचे विधान दिशाभूल करणारे असून काश्मीर प्रश्न हा केव्हाही आंतरराष्ट्रीय नव्हता. हा द्विपक्षीय प्रश्न असल्याची भूमिका भारताने सातत्याने घेतली आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटले तरी भारताच्या भूमिकेत बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आली.

Related posts: