|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » केजरीवालांबाबत मी तसे बोललोच नाही!

केजरीवालांबाबत मी तसे बोललोच नाही! 

प्रकाश जावडेकर यांचा दावा

पुणे /  प्रतिनिधी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपण अतिरेकी म्हटलेच नव्हते, असा दावा भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पुण्यात केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीची बैठक झाल्यानंतर जावडेकर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, अमर साबळे उपस्थित होते. दिल्ली येथील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावूनही भाजपाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. याबाबत नेत्यांकडून विविध कारणे सांगितली जात आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेली बेछूट टिका, गोली मारो, भारत पाकिस्तानसारखी वक्तव्ये, भाजपाला चांगलीच भोवल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांना विचारले असता ते म्हणाले, अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत, असे मी बोललोच नव्हतो. दिल्ली विधनसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर काँग्रेस पक्ष दिल्लीतून लुप्त झालेला दिसत आहे. आता काँग्रेसची ही मते आपकडे वळली का, हे माहीत नाही. मात्र, आप आणि भाजपामध्ये थेट लढत झाली.

तसेच गोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली, हे अमित शहा यांचे निरीक्षण बरोबर आहे. पण या पराभवामागे इतरही कारणे आहेत. खरेतर भाजपा हा शिकणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही या पराभवातून योग्य बोध घेऊ, असेही जावडेकर यांनी सांगितले.

 

Related posts: