|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘लिंक’ न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय

‘लिंक’ न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पॅनकार्ड-आधारकार्ड जोडणी (लिंक) न केल्यास येत्या 31 मार्चनंतर संबंधित पॅनकार्ड निष्क्रिय ठरणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभाग कार्यालयाकडून देण्यात आली. यापूर्वी पॅन-आधार जोडणीसाठी बऱयाचदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अजूनही काही कार्डधारकांनी जोडणी न केल्यामुळे प्राप्तिकर विभागाने कडक पवित्रा घेतला आहे. आता 31 मार्च 2020 ही अंतिम मुदत असे बजावत त्यानंतर ‘लिंक’ न झालेली पॅनकार्ड आर्थिक व्यवहारांसाठी निष्क्रिय ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत देशात जवळपास 30.75 कोटी जणांनी पॅन-आधारकार्डची जोडणी पूर्ण केली आहे.

 

Related posts: