|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघ अजिंक्य

गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघ अजिंक्य 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

शुक्रवारी येथे झालेल्या हिरो पुरस्कृत भारतीय महिला लिग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद गोकुळम केरळ संघाने पटकाविले. या स्पर्धेतील गोकुळम केरळ हा संघ नवा विजेता ठरला आहे.

या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात गोकुळम केरळ महिला फुटबॉल संघाने केआयवायपीएचएस संघाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. मध्यंतरापर्यंत गोकुळम केरळ संघाने 2-1 अशी आघाडी घेतली होती. गोकुळम केरळतर्फे पहिल्या 25 मिनिटात दोन गोल नोंदवेले गेले. परमेश्वरी देवी आणि कमला देवी यानी गोकुळम केरळचे हे दोन केले तर केआरवायपीएचएसए संघातर्फे डी. ग्रेसने एक गोल नोंदविला. गोकुळम केरळचा निर्णायक आणि तिसरा गोल सबित्रा भंडारीने केला.

खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटाच्या 49 व्या सेकंदाला परमेश्वरी देवीने भंडारीच्या पासवर गोकुळम केरळचे खाते उघडले. पाचच मिनिटानंतर कमला देवीने दिलेल्या पासवर भंडारीने ही आघाडी वाढविली होती. पण स्वीटी देवीने फाऊल केल्याने हा गोल नाकारण्यात आला. कमला देवीने  25 व्या मिनिटाला गोकुळम केरळचा दुसरा गोल केला. 33 व्या मिनिटाला डी ग्रेसने केआरपीएचएसएचे खाते उघडून गोकुळम केरळची आघाडी थोडी कमी केली. 69 व्या मिनिटाला रोजा देवीच्या पासवर रतनबाला देवीने शानदार गोल नोंदवत केआरपीएचएसएला बरोबरी साधून दिली.

सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना मनीषा कल्याणने निर्माण केलेल्या संधीवर भंडारीने गोकुळम केरळचा तिसरा आणि निर्णायक गोल नोंदवून या स्पर्धेचे आपल्या संघाला पहिल्यांदा विजेतेपद मिळवून दिले.

Related posts: