|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » स्मृती मानधना मानांकनात चौथ्या स्थानी

स्मृती मानधना मानांकनात चौथ्या स्थानी 

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची फंलंदाज स्मृती मानधनाने चौथे स्थान मिळविले आहे. या ताज्या मानांकन यादीत भारताची जेमी रॉड्रिग्ज सातव्या तर कर्णधार हरमनप्रित कौर नवव्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये भारताच्या तीन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मानधनाचे स्थान तीन अंकानी वधारले. तर जेमिमा रॉड्रिग्जचे स्थान थोडे घसरले. कौरच्या स्थानामध्ये कोणताही बदल झाला नाही. आयसीसीच्या टी-20 महिला गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या पुनम यादवने 12 वे स्थान मिळविले आहे. यापूर्वी ती पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये होती. पण तिचे स्थान सहा अंकांनी घसरले. न्यूझीलंडच्या सुझी बेटसने आघाडीचे स्थान मिळविले असून न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन दुसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग हिने पाचवे स्थान मिळवेले आहे. एलीस पेरीने गोलंदाजांच्या मानांकन यादीत सातवे स्थान मिळविले आहे.

Related posts: