|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » युवेंटस-एसी मिलान सामना बरोबरीत

युवेंटस-एसी मिलान सामना बरोबरीत 

वृत्तसंस्था/ मिलान

इटालियन चषक पुरूषांच्या फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी येथे झालेला युवेंटस् आणि एसी मिलान यांच्यातील अटीतटीचा  पहिल्या टप्यातील उपांत्य सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.

या सामन्यात युवेंटस् संघाला पोर्तुगालचा 35 वर्षीय फुटबॉलपटु ख्रिस्टीयानो रोनाल्डोने दुखापतीच्या कालावधीत पेनल्टीवर गोल नोंदवून ही लढत अनिर्णित राखण्यात यश मिळविले. मिलान संघातील हर्नांझडेला 71 व्या मिनिटाला पंचानी  लाल कार्ड दाखवून मैदाना बाहेर काढले. मध्यंतरापर्यंत गोल फलक कोराच होता. 61 व्या मिनिटाला एसी मिलानचे खाते कॅस्टेलिजोने उघडले. या सामन्यात सहा मिनिटांच्या दुखापतीच्या कालावधीत रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करून ज्युवेंटसला हा सामना बरोबरीत राखून दिला. रोनाल्डोने विविध स्पर्धांमधील गेल्या आठ सामन्यात 12 गोल नोंदविले असून 2020 च्या फुटबॉल हंगामात त्याने आतापर्यंत 24 गोल केले आहेत. गेल्या बुधवारी या स्पर्धेतील झालेलया उपांत्य लढतीत नापोली संघाने सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या इंटर मिलानचा 1-0 असा पराभव केला. या स्पर्धेतील  दुसऱया टप्यातील शेवटचे चार सामने 4 आणि 5 मार्चला खेळविले जाणार असून 13 मे रोजी रोममध्ये अंतिम सामना होईल.

Related posts: