|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खल्वायनचे ‘संगीत ताजमहाल’ अव्वल

खल्वायनचे ‘संगीत ताजमहाल’ अव्वल 

राज्य संगीत नाटय़ स्पर्धेचा अंतिम निकाल दिग्दर्शन, अभिनय, संगीत साथ, गायन विभागातही ‘खल्वायन’चा ठसा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

59 व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेच्या ‘संगीत ताजमहाल’ ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच संस्थेला नाटय़ निर्मितीचा प्रथम पुरस्कारही जाहीर झाला आहे. राज्य संगीत नाटय़ स्पर्धेत मुंबईच्या अमृत नाटय़भारती संस्थेच्या ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाने द्वितीय तर रत्नागिरीच्या आश्रय सेवा संस्थेच्या ‘संगीत जय जय गौरी शंकर’ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे हा निकाल जाहीर केला. 

दिग्दर्शनसाठीच्या पुरस्कारांमध्येही रत्नागिरीने ठसा उमटवला असून मनोहर जोशी (संगीत ताजमहाल) यांना प्रथम तर नितीन जोशी (जय जय गौरी शंकर) यांना द्वितीय पारितोषीक जाहीर झाले आहे. 

नेपथ्यासाठी सुरेंद्र वानखेडे (भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष) यांना प्रथम तर सिध्देश नेवसे (आपुलाचि वाद आपणासि) यांना द्वितीय  पारितोषित मिळाले आहे.

नाटयलेख व संगीत दिग्दर्शनासाठी  डॉ. विद्याधर ओक (संगीत ताजमहाल) यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून  महादेव हरमलकर व मयुरेश कस्त (दोन्ही म्हणे सोहिरा) यांनी या दोन क्षेत्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

संगीतसाथ- ऑर्गन- प्रथम  वरद सोहनी (संगीत कटय़ार काळजात घुसली) द्वितीय मधुसुदन लेले (संगीत ताजमहाल), तबला- प्रथम  हेरंब जोगळेकर (संगीत ताजमहाल) द्वितीय प्रथमेश शहाणे (संगीत जय जय गौरी शंकर) यांनी मिळवला आहे.

उत्कृष्ट अभिनयासाठीच्या रौप्यपदकासाठी गुरुप्रसाद आचार्य (कटय़ार काळजात घुसली), वामन जोग (ताजमहाल) सिध्दी बोंद्रे (मानापमान), निवेदिता चंद्रोजी (भाव तोचि देव) यांची तर संगीत गायनासाठीच्या रौप्यपदकासाठी दत्तगुरु केळकर (तुका आकाशा एवढा), अजिंक्य पोंक्षे (संगीत ताजमहाल), संपदा माने (संगीत स्वयंवर), गायत्री कुलकणी (संगीत मानापमान) यांची निवड करण्यात आली आहे.

गायनासाठीच्या गुणवत्ता प्रमाणपत्रांसाठी शारदा शेटकर (म्हणे सोहिरा), स्मिता करंदीकर (ताजमहाल), संचिता जोशी (जय जय गौरीशकर), गौरी जोशी (कटय़ार काळजात घुसली), जान्हवी खड़पकर (संशय कल्लोळ), वरद केळकर (ताजमहाल), स्वानंद भुसारी (कटय़ार काळजात घुसली), विशारद गुरव (कटय़ार काळजात घुसली),  ओंकार प्रभूधारे (संगीत स्वयंवर), दशरथ नाईक (म्हणे सोहिरा) यांची निवड झाली आहे.

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राची सहस्त्रबुध्दे (संगीत स्वयंवर), सांची तेलंग (भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष), मिताली मातोंडकर (तुका आकाशा एवढा), सुचित्रा गिरधर (आपुलाचि वाद आपणासि), श्रुतिका कदम (जय जय गौरीशंकर), अभय मुळ्ये (जय जय गौरीशंकर), गिरिश जोशी  (जय जय गौरीशंकर), विजय जोशी (ताजमहाल), सुनील जोशी (स्वयंवर), श्रेयस अतकर (भारतीय रंगभूमीचे आध नाटककार मदत अश्वघोष) यांना जाहीर झाली आहेत.

 16 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2020 या कालावधीत अतिशय जल्लोषात श्रीमंत नारापणराव घोरपडे नाटय़गृह, इचलकरंजी येथे या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये एकूण 23 नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी बकुळ पंडित, योजना शिवानंद, मुकुंद मराठे, प्रदीप ओक आणि सुधीर ठाकूर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

 

Related posts: