|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अनुकंपा भरतीत खोटी माहिती भरणे आले अंगलट

अनुकंपा भरतीत खोटी माहिती भरणे आले अंगलट 

 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेत नुकतीच अनुकंपा भरतीची यादी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये 80 जण पात्र झाल्याने आनंदित होते. मात्र त्या 80 जणांमध्ये काही उमेदवारानी चुकीची माहिती भरल्याची बाब निवड प्रक्रियेत आढळून आले. यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी त्या उमेदवारांना खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून त्यांना सात दिवसात खुलासा न दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये अशी नोटीस बजावली आहे. त्यामुळे अनुकंपा भरती प्रक्रिया वेगळ्या मोडवर असून काहींची तंतरली आहे.

सातारा जिल्हा परिषदेत गेल्या कित्येक वर्षा पासून अनुकंपा भरती निघाली नव्हती.मात्र, सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी ती भरती प्रक्रिया सुरु केली.या भरती प्रक्रिया करता जिल्हा परिषद सभागृहात वारंवार सदस्यांनी आवाज उठवला होता.नुकतीच त्याची पात्र उमेदवारांची यादी झळकली होती.त्यातील काहींनी जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुक केले होते. तर ज्यांचे नाव लागले नाही त्यांनी तक्रार केल्या होत्या.मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय  भागवत यांनी त्या पात्र उमेदवारांची उलट तपासणी केली असता काही उमेदवारानी चुकीची माहिती दिल्याचे आढळली. त्यामध्ये

गणेश ननावरे (रा.वर्ये, ता.सातारा) यांना तीन अपत्ये असल्याचे गोपनीय माहितीतून आढळून आले. कुंभारगाव(ता.पाटण) येथील श्रीमती सलमा दिलावर मुल्ला यांनी त्यांची मुलगी शबाना हिच्यासाठी अर्ज केला होता.त्यामध्ये शपथ पत्रात व्यवसाय घरकाम सांगितले आहे.मात्र गोपनीय माहितीतून त्या जिल्हा परिषद शाळेवर उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. तसेच शिंपी गल्ली सदरबझार येथील ऐश्वर्या महेश धोंगडे हिने अर्ज केला होता. त्यांची आई मंगल ह्या घरकाम करत असल्याचे शपथ पत्रात म्हटले होते परंतु त्या जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या पदावर लिपिक म्हणून कार्यरत असल्याचा आढळून आले, तसेच तुमचा विवाह झाला आहे.तसेच विजय जानू जाधव (रा.उंबरीवाडी ता जावली) यांना ही तीन अपत्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रतीक दिलीप रसाळ (रा.पेठ वडगाव कोल्हापूर) याने तर दहावी नापास असल्याचे लिहले नव्हते. त्यामुळे खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे.तुमच्यावर भाद वि स 193(2),199 व 200 फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, याबाबत सात दिवसात लेखी खुलासा देण्यात यावा, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे.त्यामुळे ही भरती प्रक्रिया वेगळ्या वळणावर आली आहे.

Related posts: