|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा-पंढरपूर रस्त्याची मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कैफियत

सातारा-पंढरपूर रस्त्याची मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कैफियत 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा-पंढरपूर मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत शिवसेनेचे साताऱयातील शिष्टमंडळ मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांच्याकडे कैफियत मांडली. त्यावर मंत्री शिंदे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी अभियंता बोरकर यांना स्वतः फोन करून कामाची चौकशी केली.

सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी, सातारा-पंढरपूर या कामावर चाललेल्या शेवटच्या काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामावर पाहणी करण्यासाठी सरकारने नेमलेले क्वालिटी कंट्रोल अधिकारी उपस्थित नव्हते. या अधिकाऱयांच्या संगनमताने कामाला कोणत्याही प्रकारचा दर्जा राहिला नाही. या कामाची काल काम मर्यादा पूर्ण झाली असून शेतकऱयांच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतकऱयांना भरपाई मिळावी, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींना भरपाई मिळावी. कामाचा दर्जा उत्तम प्रतीचा व्हावा व विशेष पथक याकामी तयार करून आपणास अहवाल देण्यात यावा, अशा मागण्या व चौकशी झाल्याशिवाय काम चालू करु नये, असे ठेकेदारांना सूचना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी स्वतः मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून दूरध्वनीवरून या अधिकाऱयाला विचारणा केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, क्षेत्र प्रमुख भानुदास कोरडे, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, सातारा तालुकाप्रमुख दत्तात्रय नलवडे, कोरेगाव शहर आकाश बर्गे, खटाव तालुका दिनेश देवकर आदी उपस्थित होते.::

Related posts: