|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सफाई कामगाराची 22 जणांना मिळाली ऑर्डर!

सफाई कामगाराची 22 जणांना मिळाली ऑर्डर! 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेत ऍड. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते वारसा हक्काने आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीपत्र वाटप सभागृहात पार पडले. हातात नियुक्तीपत्र मिळाल्याचा आनंद त्यांना झाला. 22 जणांचे चेहरे हर्षभरीत होवून सभागृहातून बाहेर पडले.

पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सफाई कामगारांना नियुक्तपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दिलेल्या नियुक्तीमध्ये धनेश कांबळे, कविता सकटे, गणेश धडचिरे, संतोष वायदंडे, दादा खंडुझोडे, सुनिता जाधव, आकाश कांबळे, अंकुश आवारे, संतोष कांबळे, सचिन आवारे, धैर्यशील कांबळे, सुशांत कांबळे, तेजस कांबळे, नागेश आवळे, राकेश खरात, कल्पना रणदिवे, वैशाली वायदंडे, गोविंद साळवे, विशाल कांबळे, रविंद्र खंडूझोडे, नितीन वायंदडे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता पालिकेच्या आरोग्य विभागात नव्याने हे 22 जण सफाई कामगार म्हणून मिळाले आहेत.::

Related posts: